चंद्र एकदा पूर्ण झाल्यापासून पुन: पूर्ण होईपर्यत किंवा एका रात्री मुळीच न दिसल्यापासून पुन्हा दिसेनासा होईपर्यत जाणारा काळ. सूर्य चंद्र यांची एकदा पूर्ण युती (अमावास्या) झाली म्हणजे त्या वेळेपासून तशीच दुसरी अमावास्या पुन्हा होईपर्यंत जो काळ जातो त्याला चांद्रमास म्हणतात