उपाधी लिहिण्याची पद्धत
सनातनचे देहत्याग केलेले संत आणि निधन झालेले साधक यांच्या नावांपूर्वी ‘कै.’ ही उपाधी लिहिण्याची पद्धत १. देहत्याग केलेल्या संतांची नावे पुढीलप्रमाणे लिहावीत – आतापर्यंत आपण देहत्याग केलेल्या संतांची नावे लिहितांना प्रथम ‘पू.’ लिहीत असू आणि त्यानंतर ‘कै.’ लावून संतांचे नाव लिहीत असू, उदा. पू. (कै.) पद्माकर होनप. मात्र समाजात प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार ‘कै.’ हे प्रथम लिहिले जाते आणि नंतर व्यक्तीच्या उपाधीसह तिचे नाव लिहिले जाते. आपण निधन झालेल्या साधकांच्या संदर्भात हेच सूत्र वापरत आहोत. केवळ संतांच्या संदर्भात ‘पू.’ प्रथम लिहून नंतर ‘(कै.)’ लिहीत आहोत. समाजाच्या दृष्टीने हे योग्य नाही. त्यामुळे आता संतांच्या संदर्भातही ‘कै.’ प्रथम लिहून नंतर नाव लिहिण्याचे सूत्र अवलंबायचे ठरले आहे. म्हणजे संतांचे नाव ‘कै. पू. पद्माकर होनप’ असे लिहावे. अन्य संतांची नावे उदाहरणादाखल पुढे दिली आहेत - कै. पू. (सौ.) निर्मला होनप कै. पू. प्रा. रत्नाकर मराठे कै. सद्गुरु (सौ.) आशालता सखदेव २. निधन झालेल्या आणि आध्यात्मिक पातळी असलेल्या अन् नसलेल्या साधकांची नावे पुढीलप्रमाणे लिहावीत - कै. (सौ.) ऋतुजा चव्हाण कै. डॉ. आदगोंडा पाटील कै. (कु.) दीप्ती पंत कै. (श्रीमती) अलका जोग कै. धैवत वाघमारे
Attachments