Search Results
5 wordsआध्यात्मिक उपाय
Meaning:
एखाद्याच्या मनात पुष्कळ विचार येत असतांना, मन एकाग्र होत नसतांना, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा अशांत वाटत असतांना जप, ध्यान, प्राणायाम, मंत्रजप, प्रार्थना इत्यादी आध्यात्मिक कृती केल्याने किंवा त्या करण्यासाठी एखादे उन्नत साधक अथवा संत यांनी साहाय्य केल्यामुळे किंवा त्यांच्या सान्निध्यात जप केल्यामुळे साधकाचे मन स्थिरावते / प्रसन्न होते. अशा आध्यात्मिक कृतींना ‘आध्यात्मिक उपाय’ असे म्हटले आहे.
Other Translations:
आध्यात्मिक पातळी
Meaning:
प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण असतात. व्यक्तीने साधना चालू केल्यावर तिच्यामधील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होते आणि सत्त्वगुणाचे प्रमाण वाढू लागते. व्यक्तीमधील सत्त्वगुणाच्या प्रमाणावर तिची आध्यात्मिक पातळी (स्तर) अवलंबून असते. ‘सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते, तर मोक्षाला गेलेल्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी १०० टक्के असते’, असे गृहित धरून पातळी टक्क्यांमध्ये लिहिली आहे.
Other Translations:
ग्रंथातील टक्केवारीची भाषा
Meaning:
ग्रंथात थोडे, मध्यम आणि तीव्र यांना त्यांच्या प्रमाणानुसार अनुक्रमे १ ते ३० टक्के, ३१ ते ६० टक्के अन् ६१ ते १०० टक्के म्हटले आहे.
Other Translations:
संकल्प
Meaning:
एखादे कार्य करण्यासाठी मनात केलेला पक्का ठराव
Other Translations:
हिंदू राष्ट्र
Meaning:
धर्मावर आधारित आदर्श राष्ट्राची संकल्पना
Other Translations: