चंद्र, मंगळ, राहु, केतु आणि शनि हे ग्रह रात्री बलवान, रवि, गुरु, शुक्र हे दिवसा बलवान, बुध सर्वकाळ बलवान असतो. क्रूर ग्रह कृष्ण पक्षात आणि शुभ ग्रह शुक्ल पक्षात बलवान असतात. शुभ ग्रह उत्तरायणात आणि क्रूर ग्रह, पाप ग्रह दक्षिणायनात बलवान असतात. ग्रह कोणत्या राशीत (स्वराशी, उच्च राशी, मित्र राशी) आणि कोणत्या स्थानात (बलिष्ट स्थानी - केंद्र स्थाने, त्रिकोण स्थाने. बलहीन स्थाने, पणफर स्थाने, अपोक्लिम स्थाने) आहेत.यावरुन ग्रहांचे बल पाहिले जाते. कोणताही ग्रह आपल्या स्वराशीत बलवान असतो. त्या खालोखाल उच्च राशीत आणि त्याही पेक्षा खालोखाल आपल्या मित्राच्या राशीत बलवान असतो