कालनिर्णयाची एक पद्धत. तार्तियक शास्त्र. आयुष्यामध्ये कोणत्यावेळी कोणता फलादेश भोगावयास लागेल याचे ज्ञान करून देण्याची एक महत्त्वाची पद्धत. हे शास्त्र ब्रह्मद्वेष्ट्या तुरुष्क पंडितांनी रचिले आहे. आपल्या आयुष्यातील ज्या वर्षांचा फलादेश पहावयाचा असेल त्या वर्षारंभकालाची लग्नकुंडली मांडून त्यावरून फलादेश करतात. जन्मकालची कुंडली ही रवीच्या सुक्ष्मांशकलात्मक स्थितीवर अवलंबून असल्याने तसा रवी प्रतिवर्षी नेमका त्या ठिकाणी ज्या वेळेस येतो त्या वेळेची कुंडली मांडून त्या वर्षापुरती ती जन्मकुंडली असे समजून तिच्यावरून फलादेश करणे