प्रयाणाविषयीची शुभ अशुभ वेळ. त्र्यंक मुहूर्त पहाण्याची पद्धत पुढिलप्रमाणे ज्या तिथीवर प्रयाण करावयाचे असेल त्या (शुक्लादिपासून) तिथी संख्येची दुप्पट करून त्या दुपटीला ७ ने भागावे. ० बाकी राहिल्यास मार्गात पीडा होईल. प्रयाण समयीची वार संख्या तिप्पट करून ८ नी भागावे, ० बाकी राहिल्यास भय उत्पन्न होईल आणि प्रयाण समयी असलेल्या नक्षत्र संख्येची चौपट करून ६ नी भागावे, ० बाकी राहिल्यास मृत्युसमान दु:ख प्राप्त होईल. तिन्ही भागाकारात इतर अंक रहातील तर शुभ फल समजावे