Language (भाषा): Parkiya_Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): उरूस
Meaning (अर्थ): उरूस अथवा ‘उर्स’ ही इस्लाम धर्मातील संज्ञा असून तिचे दोन अर्थ आहेत, विवाहानिमित्तची जेवणावळ आणि मुसलमान सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेला उत्सव. गौस लाजम, दस्तगीर, दादा हयात, कलंदर यांसारख्या मुसलमान सत्पुरुषांच्या दरवर्षी येणार्‍या पुण्यतिथीनिमित्त हा उत्सव असतो. यासाठी अनेक लोक एकत्र येतात. सत्पुरुषाच्या कबरीवर नवे वस्त्र चढवून धार्मिक गीते म्हणत लोक हा उत्सव साजरा करतात. उत्सवानिमित्त अनेक लोक एकत्र जमल्याने त्याला जत्रेचे स्वरूप आले आणि पुढे त्यासच उरूस म्हणू लागले असावे.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):