जोडाक्षर लिहिताना पहिले अक्षर पाय मोडून लिहावे — उदा. 'क्त', 'स्त'. जुनी पद्धत (अर्धे अक्षर वर) वापरू नये.
navin
१. देहत्याग केलेल्या संतांची नावे पुढीलप्रमाणे लिहावीत –
आतापर्यंत आपण देहत्याग केलेल्या संतांची नावे लिहितांना प्रथम ‘पू.’ लिहीत असू आणि त्यानंतर ‘कै.’ लावून संतांचे नाव लिहीत असू, उदा. पू. (कै.) पद्माकर होनप. मात्र समाजात प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार ‘कै.’ हे प्रथम लिहिले जाते आणि नंतर व्यक्तीच्या उपाधीसह तिचे नाव लिहिले जाते. आपण निधन झालेल्या साधकांच्या संदर्भात हेच सूत्र वापरत आहोत. केवळ संतांच्या संदर्भात ‘पू.’ प्रथम लिहून नंतर ‘(कै.)’ लिहीत आहोत. समाजाच्या दृष्टीने हे योग्य नाही. त्यामुळे आता संतांच्या संदर्भातही ‘कै.’ प्रथम लिहून नंतर नाव लिहिण्याचे सूत्र अवलंबायचे ठरले आहे. म्हणजे संतांचे नाव ‘कै. पू. पद्माकर होनप’ असे लिहावे. अन्य संतांची नावे उदाहरणादाखल पुढे दिली आहेत -
कै. पू. (सौ.) निर्मला होनप
कै. पू. प्रा. रत्नाकर मराठे
कै. सद्गुरु (सौ.) आशालता सखदेव
२. निधन झालेल्या आणि आध्यात्मिक पातळी असलेल्या अन् नसलेल्या साधकांची नावे पुढीलप्रमाणे लिहावीत -
कै. (सौ.) ऋतुजा चव्हाण
कै. डॉ. आदगोंडा पाटील
कै. (कु.) दीप्ती पंत
कै. (श्रीमती) अलका जोग
कै. धैवत वाघमारे
यापूर्वी आपण सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या धारिकेत शेवटी त्या साधकाचे नाव लिहून कंसात (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) असे लिहित होतो. आता प्रमुख साधकांनी त्या साधकाचे नाव आणि कंसात (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), असे लिहिण्यास सांगितले आहे. त्याचे उदाहरण पुढे दिले आहे.
पूर्वीची पद्धत
- श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १८.११.२०२५, वेळ : दुपारी १२ आणि एकूण कालावधी : ५ सेकंद; ज्ञानाचे टंकलेखन अन् संकलन करण्याचा दिनांक : १८.११.२०२५ आणि एकूण कालावधी : ३५ मिनिटे) ॐ
प्रमुख साधकांनी सांगितलेली नवीन पद्धत
-श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १८.११.२०२५, वेळ : दुपारी १२ आणि एकूण कालावधी : ५ सेकंद; ज्ञानाचे टंकलेखन अन् संकलन करण्याचा दिनांक : १८.११.२०२५ आणि एकूण कालावधी : ३५ मिनिटे) ॐ
टीप : प्रमुख साधकांनी पुढील पालट २३.१.२०२६ या दिवशी Dn_RamH_Ghadyal_Baju25 या धारिकेत सांगितला आहे.
‘काही वेळा परात्पर गुरु डॉक्टरांनी हस्तलिखिताच्या लिखाणाला मथळा दिलेला असतो. त्या वेळी आपल्याला लिखाणाच्या आशयाला धरून आणखी चांगला मथळा सुचला, तर परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या मथळ्याऐवजी आपण आपला मथळा देऊ शकतो’, असे प्रमुख साधकांनी सांगितले आहे.’ (सूचना लिहिणारी – (२२.११.२०२५))
यापुढे सर्व साधक-साधिका, बालसाधक आणि संत यांच्या वाढदिवसाच्या लिखाणातील शिरोभागात, मुख्य मथळ्यात आणि शुभेच्छा देतो, त्या मथळ्यात ‘त्यांचा वाढदिवस कितवा ?’, असे घालावे.
उदा.
शिरोभाग : श्रावण शुक्ल पक्ष चतुर्थी (१२.८.२०२१) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांचा ४२ वा वाढदिवस आहे.
मथळा : प्रेमळ, अभ्यासू वृत्तीचे आणि साधनेमुळे स्वतःत पालट घडवून आणणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. महेंद्र सहस्रबुद्धे (वय ४२ वर्षे)
शुभेच्छा देतो, तो मथळा : श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांना ४२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !