सनातन भाषा संपदा
शब्दकोश
शब्दकोश
|
व्याकरण
|
सनातन ग्रंथ सूची
Tools
Converter : Unicode to Shreelipi
Converter : Shreelipi to Unicode
Install Chrome Extension : Google Input Tools
Login
शब्दकोश
Request Form
सनातन भाषा संपदा
(Sanatan Bhasha Sampada)
Please select the language you would like to proceed in.
×
Marathi
English
Hindi
Sanskrut
Kannada
You can change your preference by clicking on Change Language Button
सूचना : भाषेमध्ये (भाषा ड्रॉपडाउन)
×
* Parkiya_Marathi म्हणजे - उर्दू, अरबी, फारसी इत्यादी भाषांतील शब्दांचे मराठी लिपीतील रूप
* Marathi_English म्हणजे मराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजी लिपीतील रूप.
* English_Marathi म्हणजे - इंग्रजी भाषेतील शब्दांचे मराठी लिपीतील रूप. यानुसार अन्य भाषांत पण Parkiya व English अशा उपभाषा आहेत.
* Hindi_English म्हणजे हिंदी भाषेतील शब्दांचे इंग्रजी लिपीतील रूप.
Note
Dictionary :
- Select -
Marathi
English
Hindi
Sanskrut
Kannada
Loading...
Processing...
search
find_in_page
Words by Alphabet
Words by Language
Marathi
Parkiya_Marathi
English_Marathi
Words by Category
- Category -
Uncategorized
General
Spiritual
Music
Dance
Folk
Instrumental
Theatre
Bussiness
Medical
Astrology
Islamic
Christian
उच्च राशी
Astrology
Marathi
Meaning
प्रत्येक राशीची जशी स्वराशी असते तशी प्रत्येक राशीची स्वत:ची उच्च राशी असते. राशीच्या उच्च राशी पुढिलप्रमाणे : रवि - मेष...
प्रत्येक राशीची जशी स्वराशी असते तशी प्रत्येक राशीची स्वत:ची उच्च राशी असते. राशीच्या उच्च राशी पुढिलप्रमाणे : रवि - मेष, चंद्र - वृषभ, मंगळ - मकर, बुध - कन्या, गुरु - कर्क, शुक्र - मीन, शनि - तुळ
उत्पात योग
Astrology
Marathi
Meaning
रविवारी विशाखा, सोमवारी पूर्वाषाढा, मंगळवारी धनिष्ठा, बुधवारी रेवती, गुरुवारी रोहिणी, शुक्रवारी पुष्य आणि शनिवारी उत्तरा...
रविवारी विशाखा, सोमवारी पूर्वाषाढा, मंगळवारी धनिष्ठा, बुधवारी रेवती, गुरुवारी रोहिणी, शुक्रवारी पुष्य आणि शनिवारी उत्तराफाल्गुनी अशी नक्षत्रे असता उत्पात नामक अशुभ योग होतो
उदित गोलार्ध
Astrology
Marathi
Meaning
सूर्याचा प्रकाश जेथे पडतो तो. सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंतचा भाग कुंडलीतील १, १२, ११, १०. ९, ८ ही स्थाने
उन्मीलन
Astrology
Marathi
Meaning
ग्रहण मोक्ष. खग्रास ग्रहणानंतर बिंब दर्शनास प्रारंभ झाला म्हणजे त्याला उन्मीलन म्हणतात
उपचय स्थाने
Astrology
Marathi
Meaning
कुंडलीतील ३, ६, १०, ११ ही स्थाने
उभयान्वयी योग
Astrology
Marathi
Meaning
दोघांना जोडणारा
उर्ध्वमुख नक्षत्रे
Astrology
Marathi
Meaning
जमिनीवरील बांधकामाला उपयुक्त. उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आर्द्रा, श्रवण, धनिष्ठा आणि आर्द्रा या...
जमिनीवरील बांधकामाला उपयुक्त. उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आर्द्रा, श्रवण, धनिष्ठा आणि आर्द्रा यांना उर्ध्वमुख म्हणतात. या काळी राजवाडा, गृह या संबंधीची शोभादायक कामे करावी
ऊर्ध्वयामोत्तरवृत्त
Astrology
Marathi
Meaning
मध्यान्हवृत्त
ऋणमोचनार्थ
Astrology
Marathi
Meaning
कर्ज मुक्ततेसाठी
एकपाददृष्टी
Astrology
Marathi
Meaning
ग्रह आपल्या स्थानापासून ३ आणि ११ या स्थानावर पहातो ती दृष्टी. ही दृष्टी सुख लाभ देणारी, स्नेहवर्धक आणि बुद्धिदात्री असते
एकराश्यंतरयोग
Astrology
Marathi
Meaning
दोन ग्रहात ३० अंशाचे अंतर होते तेव्हा हा योग होतो. हा शुभ योग आहे
ओज
Astrology
Marathi
Meaning
सम राशी
औस
Astrology
Marathi
Meaning
अमावास्या
कंकणाकृती
Astrology
Marathi
Meaning
कंकणाच्या आकाराचे
कंटकमुहूर्त
Astrology
Marathi
Meaning
इष्ट वारापासून मंगळवारापर्यंत वार मोजून येणार्या संख्येशी दुप्पट करावी. त्या इष्ट वारी या दुप्पटीच्या संख्येइतका मुहूर्...
इष्ट वारापासून मंगळवारापर्यंत वार मोजून येणार्या संख्येशी दुप्पट करावी. त्या इष्ट वारी या दुप्पटीच्या संख्येइतका मुहूर्त कंटक मुहूर्त असतो. हा शुभ कार्याला वर्ज्य मानतात
कंटकस्थाने
Astrology
Marathi
Meaning
केंद्र स्थाने, विष्णु स्थाने, चतुष्टय स्थाने
कपिलाषष्ठी
Astrology
Marathi
Meaning
भाद्रपद कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीच्या वेळी सूर्य हस्त नक्षत्रात असेल, व्यतिपात योग असेल, मंगळवार असेल, चंद्र नक्षत्र रोह...
भाद्रपद कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीच्या वेळी सूर्य हस्त नक्षत्रात असेल, व्यतिपात योग असेल, मंगळवार असेल, चंद्र नक्षत्र रोहिणी असेल तर त्या षष्ठीला कपिलाषष्ठी म्हणतात. महिना, तिथी, रवी नक्षत्र, चंद्र नक्षत्र, योग, वार या सहा गोष्टी जुळून येणारा दिवस, दुर्मिळ संधी
कमलयोग
Astrology
Marathi
Meaning
सर्व ग्रह १, ४, ७, १० स्थानी असणे
करण
Astrology
Marathi
Meaning
चंद्राला सूर्याच्या पुढे जाण्यास जो वेळ लागतो त्याला करण असे म्हणतात. तिथीचा अर्धा भाग १ बव, २ बालव, ३ कौलव, ४ तैतिल, ५...
चंद्राला सूर्याच्या पुढे जाण्यास जो वेळ लागतो त्याला करण असे म्हणतात. तिथीचा अर्धा भाग १ बव, २ बालव, ३ कौलव, ४ तैतिल, ५ गर, ६ वणिज, ७ विष्टी ही चर करणे आणि शकुन, चतुष्पाद, नाग, किंस्तुघ्न ही स्थिर करणे. एका तिथीत दो करणे होतात
कराष्टमी
Astrology
Marathi
Meaning
आश्विन वद्य ८ तिथी
करिदिन
Astrology
Marathi
Meaning
१. वैशाख कृ. ३० म्हणजे भावुका अमावास्या. २. कर्क संक्रमण म्हणजे १६ जुलैच्या सुमारास. ३. मकर संक्रमण म्हणजे १४ जानेवारीच्...
१. वैशाख कृ. ३० म्हणजे भावुका अमावास्या. २. कर्क संक्रमण म्हणजे १६ जुलैच्या सुमारास. ३. मकर संक्रमण म्हणजे १४ जानेवारीच्या सुमारास. ४. फाल्गुन शुद्ध १५ म्हणजे होळी पौर्णिमा. ५. प्रेतदाहविधीचा दिवस. ६. उत्तर अयनाचा प्रारंभ दिवस. ७. दक्षिण अयनाचा प्रारंभ दिवस या सात दिवसाच्या दुसर्या दिवसाला, तसेच सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या पुढच्या दिवसाला करिदिन म्हणून अशुभ मानले जाते
कर्तरी दोष
Astrology
Marathi
Meaning
इष्टकालीन लग्न कुंडलीत द्वितीय स्थानी पापग्रह वक्री असून द्वादश स्थानी पापग्रह मार्गी असता कर्तरी दोष होतो
अशुभ ग्रह
Astrology
Marathi
Meaning
शुभ फल देण्यास असमर्थ. कुंडलीतील ६, ८, १२ या स्थानाचे अधिपती. नीच, शत्रुगृही, पाप ग्रहाने युक्त अथवा दृष्ट, पाप ग्रहांच्...
शुभ फल देण्यास असमर्थ. कुंडलीतील ६, ८, १२ या स्थानाचे अधिपती. नीच, शत्रुगृही, पाप ग्रहाने युक्त अथवा दृष्ट, पाप ग्रहांच्या वर्गी, संधिगत, अष्टक वर्गात थोड्या बिंदूनी युक्त, अशांत, अस्तंगत, शुभ ग्रहांनी युक्त वा दृष्ट नसता ग्रह अशुभ असतो
कर्तरी योग
Astrology
Marathi
Meaning
एखाद्या ग्रहाच्या किंवा स्थानाच्या मागील आणि पुढील राशीत ग्रह असता हा योग होतो. शुभ ग्रह असता शुभ कर्तरी आणि पाप ग्रह अस...
एखाद्या ग्रहाच्या किंवा स्थानाच्या मागील आणि पुढील राशीत ग्रह असता हा योग होतो. शुभ ग्रह असता शुभ कर्तरी आणि पाप ग्रह असता पाप कर्तरीयोग होता
कर्तृत्व त्रिकोण
Astrology
Marathi
Meaning
कुंडलीतील २, ६, १० ही स्थाने
कर्तृत्व स्थाने
Astrology
Marathi
Meaning
तृतीय स्थान
कर्म स्थान
Astrology
Marathi
Meaning
कुंडलीतील दहावे स्थान
कर्मेश
Astrology
Marathi
Meaning
कुंडलीतील दहाव्या स्थानाचा अधिपती
कल्प
Astrology
Marathi
Meaning
ब्रह्मदेवाचा दिवस. १४ मन्वंतरे (४, २९, ४०, ८०, ००० वर्षे) आणि १५ संधिकाल (२,५९,२०,००० वर्षे) यांची बेरीज ४,३२,००,००,०००...
ब्रह्मदेवाचा दिवस. १४ मन्वंतरे (४, २९, ४०, ८०, ००० वर्षे) आणि १५ संधिकाल (२,५९,२०,००० वर्षे) यांची बेरीज ४,३२,००,००,००० वर्षे म्हणजे एक कल्प होतो. एवढ्याच काळात १००० महायुगे होतात.
कल्पद्रुमयोग
Astrology
Marathi
Meaning
लग्नेश ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामी आणि तो ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामी असे दोघांच; नवांश हे सर्व जर केंद्र,...
लग्नेश ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामी आणि तो ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामी असे दोघांच; नवांश हे सर्व जर केंद्र, त्रिकोण किंवा उच्च राशीत असतील तर हा योग होतो
कल्याणी
Astrology
Marathi
Meaning
भद्रा, विष्टी करण
कामत्रिकोण
Astrology
Marathi
Meaning
कुंडलीतील ३,७,११ ही स्थाने.
कारक
Astrology
Marathi
Meaning
ज्याच्यावर ठराविक गोष्टी अवलंबून आहेत असा, कारक म्हणजे काम करणारा ग्रहांच्या किंवा स्थानाच्या नेमून दिलेल्या कारकत्वाप्र...
ज्याच्यावर ठराविक गोष्टी अवलंबून आहेत असा, कारक म्हणजे काम करणारा ग्रहांच्या किंवा स्थानाच्या नेमून दिलेल्या कारकत्वाप्रमाणे काम करणारा ग्रह
कारकस्वामी
Astrology
Marathi
Meaning
विशिष्ट गोष्टी संबंधीचे कार्य करणारा ग्रह
कारकेश
Astrology
Marathi
Meaning
कार्य करणारा ग्रह
कार्तिकस्वामी
Astrology
Marathi
Meaning
षडानन, गणपतीचा भाऊ
कालसर्पयोग
Astrology
Marathi
Meaning
राहु-केतुच्या एका बाजुस सर्व ग्रह असता हा योग येतो
काल होरा
Astrology
Marathi
Meaning
सूर्योदयापासून दर एक तासाने गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र आणि शनि या अनुक्रमाने प्रत्येक वाराचा पहिला होरा तोच वार...
सूर्योदयापासून दर एक तासाने गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र आणि शनि या अनुक्रमाने प्रत्येक वाराचा पहिला होरा तोच वार धरून पहातात
काहलयोग
Astrology
Marathi
Meaning
१. नवम आणि चतुर्थ या स्थानाचे स्वामी एकमेकांच्या केंद्री असून जर लग्न स्वामी बलवान असेल तर हा योग होतो. २. चतुर्थाधिपती...
१. नवम आणि चतुर्थ या स्थानाचे स्वामी एकमेकांच्या केंद्री असून जर लग्न स्वामी बलवान असेल तर हा योग होतो. २. चतुर्थाधिपती उच्च किंवा स्वगृही असून दशमेशाने युक्त किंवा दृष्ट असेल तर काहलयोग होतो
काळराहु
Astrology
Marathi
Meaning
महत्त्वाच्या कार्याला राहुची अनुकूलता पहाणे. रविवारी आणि गुरुवारी राहु पूर्वेस असतो, सोमवारी आणि शुक्रवारी राहु दक्षिणेस...
महत्त्वाच्या कार्याला राहुची अनुकूलता पहाणे. रविवारी आणि गुरुवारी राहु पूर्वेस असतो, सोमवारी आणि शुक्रवारी राहु दक्षिणेस असतो, मंगळवारी राहु पश्चिमेस असतो आणि बुधवारी आणि शनिवारी राहु उत्तरेस असतो. प्रयाणकाळी राहु पृष्ठभागी आणि डाव्या बाजूस असता कार्यसिद्धी होते आणि संमुख आणि उजव्या बाजूस असता कार्यहानी होते
कुटुंबस्थान
Astrology
Marathi
Meaning
कुंडलीतील दुसरे घर
कुंभ विवाह
Astrology
Marathi
Meaning
कन्येला वैधव्य दोष असता दोष परिहारार्थ विवाहापूर्वी कुंभाच्या मध्यभागी विष्णूची प्रतिमा स्थापून कुंभविवाह करतात
कुमार ग्रह
Astrology
Marathi
Meaning
ग्रह १, ३, ५, ७, ९, ११ या विषम राशीत ७ ते १२ अंशापर्यंत असता आणि २, ४, ६, ८, १०, १२ या सम राशीत १९ ते २४ या अंशापर्यंत अ...
ग्रह १, ३, ५, ७, ९, ११ या विषम राशीत ७ ते १२ अंशापर्यंत असता आणि २, ४, ६, ८, १०, १२ या सम राशीत १९ ते २४ या अंशापर्यंत असता तो कुमार ग्रह असतो
कुहु अमावास्या
Astrology
Marathi
Meaning
सिनिवाली, दर्श आणि कुहु असे अमावास्येचे तीन प्रकार आहेत, त्यातील एक प्रकार. कृष्ण चतुर्दशीने युक्त अशा अमावास्या तिथीच्य...
सिनिवाली, दर्श आणि कुहु असे अमावास्येचे तीन प्रकार आहेत, त्यातील एक प्रकार. कृष्ण चतुर्दशीने युक्त अशा अमावास्या तिथीच्या शेवटच्या दोन प्रहरांना कुहु म्हणतात
कृष्ण पक्ष
Astrology
Marathi
Meaning
वद्यपक्ष. वद्यपक्षाच्या प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा १५ तिथींचा काळ
कृष्णमूर्ती पद्धत
Astrology
Marathi
Meaning
के. अेस. कृष्णमूर्ती यांची स्वत:ची भविष्य पद्धत. तामिळनाडू राज्यातील थिरुवयरू या गावी १.११.१९०८ या साली जन्म, ४० वर्षे प...
के. अेस. कृष्णमूर्ती यांची स्वत:ची भविष्य पद्धत. तामिळनाडू राज्यातील थिरुवयरू या गावी १.११.१९०८ या साली जन्म, ४० वर्षे प्राचीन आणि पाश्चात्य ज्योतिष ग्रंथाचा अभ्यास करून त्यातील उणिवा लक्षात घेऊन स्वत:ची अशी कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शोधून काढली
केतु
Astrology
Marathi
Meaning
ध्वज, पताका
केदार योग
Astrology
Marathi
Meaning
चार राशीत सर्व ग्रह असता हा योग होतो. हा शुभ योग मानला जातो
केंद्रत्रिकोण
Astrology
Marathi
Meaning
कुंडलीतील १, ४, ५, ७, ९, १० ही स्थाने
केंद्रस्थानी
Astrology
Marathi
Meaning
कुंडलीतील १, ४, ७, १० या स्थानी
«
1
2
...
182
183
184
185
186
187
188
...
191
192
»