तिखळे दोष
Astrology Marathi
Meaning तीन मुलींवर मुलगा किंवा तीन मुलांवर मुलगी होणे
तिथी
Astrology Marathi
Meaning महिन्याचा तिसावा भाग. सूर्य , चंद्र एकत्र आल्यापासून चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे पूर्वेला जाऊ लागतो. अशा रीतीने सूर्...
तिथी गंडांत
Astrology Marathi
Meaning षष्ठी, एकादशी आणि प्रतिपदा या तिथींच्या पहिल्या एकेक घटिका हे काल तिथी गंडांताचे असतात. हे काल शुभ कार्याला वर्ज्य आहे
तिथीपालन
Astrology Marathi
Meaning तिथीकरता पाळावयाची काही बंधने. तिथीला पुढीलप्रमाणे गोष्टी वर्ज्य कराव्या. प्रतिपदा - कोहळा, द्वितीया - डोरली, तृतीया - ल...
तिथीवृद्धी
Astrology Marathi
Meaning तिथीचा आरंभ सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाबरोबर होऊन अंत दुसरे दिवशीच्या सूर्योदयानंतर होतो असा दिवस
तिथीक्षय
Astrology Marathi
Meaning तिथीचा प्रारंभ आणि अंत सूर्योदयावाचून होतो तो दिवस
तिनीत्रिकाळ
Astrology Marathi
Meaning सकाळ, दुपार आणि संध्याकाळ
तिन्हीसांज
Astrology Marathi
Meaning संध्याकाळ
तीन अवस्था
Astrology Marathi
Meaning बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य
तीन ऋण
Astrology Marathi
Meaning देव, ऋषि आणि पितृ ऋण
तीर्थ
Astrology Marathi
Meaning पुण्यक्षेत्र, देवाचे पादोदक
तिर्थङमुखनक्षत्रे
Astrology Marathi
Meaning पुनर्वसु, अनुराधा, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, मृगशीर्ष, रेवती आणि अश्विनी या नक्षत्रांना तिर्थङमुख नक्षत्रे म्हणतात...
तीर्थप्रसाद
Astrology Marathi
Meaning देवाचे पादोदक आणि प्रसाद म्हणून दिलेले फूल, फळ, रक्षा वगैरे
तीर्थवटी
Astrology Marathi
Meaning तीर्थ ठेवण्याचे भांडे
तीर्थविधी
Astrology Marathi
Meaning तीर्थाचे ठिकाणी, क्षौर, श्राद्ध वगैरे करण्याचा विधी
तुकाराम बीज
Astrology Marathi
Meaning फाल्गुन कृष्ण २ तिथी
तृतीय स्थान
Astrology Marathi
Meaning कुंडलीतील तिसरे घर
तृतीयेश
Astrology Marathi
Meaning तृतीय स्थानाचा अधिपती
त्रिएकादशयोग
Astrology Marathi
Meaning दोन ग्रहांमध्ये ६० अंशाचे अंतर असणे. दोन ग्रह एकमेकांपासून ३ आणि ११ या स्थानावर असणे
त्रिकप्रसव
Astrology Marathi
Meaning अनुक्रमे तीन पुत्रांवर कन्या जन्मणे किंवा तीन मुलींवर पुत्र जन्मणे
त्रिकाल
Astrology Marathi
Meaning भूत, वर्तमान आणि भविष्य हे तीन काळ
त्रिकालदर्शी
Astrology Marathi
Meaning योगादि बलाने भूत, वर्तमान आणि भविष्य जाणणारा, सर्वज्ञ
त्रिकालज्ञ
Astrology Marathi
Meaning भूत, वर्तमान आणि भविष्य काळात घडणार्‍या गोष्टीचे आकलन ज्याला होते तो
त्रिकालज्ञान
Astrology Marathi
Meaning भूत, वर्तमान आणि भविष्य याचे योग सामर्थ्याने होणारे ज्ञान
त्रिकोणयोग
Astrology Marathi
Meaning दोन ग्रहामध्ये १२० अंशाचे अंतर असता हा दृष्टी योग होतो. हा पूर्ण शुभ मानला आहे
त्रिकोण स्थाने
Astrology Marathi
Meaning कुंडलीतील ५ आणि ९ स्थाने. लक्ष्मीस्थाने
त्रिगुण
Astrology Marathi
Meaning सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण
त्रिदोष
Astrology Marathi
Meaning कफ, वात, पित्त यांचा क्षोम
त्रिद्युस्पृक तिथी
Astrology Marathi
Meaning एका तिथीने तीन वारांना स्पर्श केला म्हणजे त्रिद्युस्पृक तिथी होते. ही तिथी शुभ कार्यांस वर्ज्य आहे
त्रिपाददृष्टी
Astrology Marathi
Meaning ग्रह आपल्या स्थित स्थानांपासून ५ आणि ९ या स्थानावर त्रिपाद दृष्टीने पहातो. त्रिपाद दृष्टी मित्रवृद्धी करणारी आणि सुखदायक...
त्रिपादनक्षत्रे
Astrology Marathi
Meaning कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा, विशाखा, उत्तराषाढा आणि पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांना त्रिपाद नक्षत्रे म्हणतात. वृद्धी, लाभ,...
त्रिपुरारी पौर्णिमा
Astrology Marathi
Meaning प्रदोष कालयुक्त कार्तिक शुक्ल पौर्णिमा. या दिवशी त्रिपुर दीप लावतात
त्रिरेकादशयोग
Astrology Marathi
Meaning दोन ग्रहामध्ये ६० अंशाचे अंतर असता हा दृष्टीयोग होतो. हा शुभ मानला आहे
त्रिशांश कुंडली
Astrology Marathi
Meaning षडवर्ग कुंडल्यापैकी एक प्रकार. यात सम राशी आणि विषम राशी असे दोन विभाग पाडले असून निरनिराळ्या अंशावर निरनिराळ्या ग्रहांच...
त्रिशांश कोष्टक
Astrology Marathi
Meaning त्रिशांश कुंडली कशी मांडावी याचे कोष्टक. या कोष्टकात कोणत्या राशीच्या किती अंशापर्यंतच्या विभागावर कोणत्या राशी स्वामींच...
त्रिषडाय
Astrology Marathi
Meaning कुंडलीतील ३,६, ११ ही स्थाने
त्रिषडाय पति
Astrology Marathi
Meaning कुंडलीतील ३,६, ११ या स्थानांतील राशीचे अधिपती
त्रिस्थळी यात्रा
Astrology Marathi
Meaning काशी, प्रयाग, गया या तीर्थांची यात्रा
त्रैलोक्य
Astrology Marathi
Meaning स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तीन लोक
त्र्यंक मुहूर्त
Astrology Marathi
Meaning प्रयाणाविषयीची शुभ अशुभ वेळ. त्र्यंक मुहूर्त पहाण्याची पद्धत पुढिलप्रमाणे ज्या तिथीवर प्रयाण करावयाचे असेल त्या (शुक्लाद...
दग्ध नक्षत्रे
Astrology Marathi
Meaning वार आणि नक्षत्रे यांच्या संयोगाने होणारे अशुभ योग. रविवारी भरणी, सोमवारी चित्रा, मंगळवारी उत्तराषाढा, बुधवारी धनिष्ठा, ग...
दग्धयोग
Astrology Marathi
Meaning एक अशुभ योग. सोमवारी एकादशी, रविवारी द्वादशी, गुरुवारी षष्ठी, बुधवारी तृतीया, शुक्रवारी अष्टमी, शनिवारी नवमी आणि मंगळवार...
दंडमालायोग
Astrology Marathi
Meaning दण्ड योग
दण्डयोग
Astrology Marathi
Meaning दशमस्थान आणि त्याच्या पुढील तीन स्थानात सर्व ग्रह असणे
दत्त जयंती
Astrology Marathi
Meaning मार्गशीर्ष शुद्ध १५, मार्गशीर्षातील पौर्णिमा
दर्श
Astrology Marathi
Meaning अमावास्या. अमावास्येस करण्याचे मासिक श्राद्ध या दिवशी करतात. आपला एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस, म्हणून दर अमावास्येल...
दर्शअमावास्या
Astrology Marathi
Meaning अमावास्येचा एक प्रकार. कोणत्याही एका वारी संपूर्ण अहो रात्रातील ६० घटकांचा काल अमावास्या असल्यास दर्श अमावास्या म्हणतात....
दशमेश
Astrology Marathi
Meaning दशमाधिपती, दहाव्या स्थानाचा स्वामी
दशा
Astrology Marathi
Meaning स्थिती, अवस्था, मनुष्याला भोगावी लागणारी सुख-दु:खदायक जन्मकालीन ग्रहांची स्थिती. जन्मपत्रिकेवरून या जन्मी भोगावा लागणारा...
दशांश
Astrology Marathi
Meaning ग्रहाचा १।१० वा भाग